1. एरोपोनिक तंत्र :
या पद्धतीमध्ये वनस्पतीच्या अथवा भाजीपाल्याच्या रोपांना थेट पाणी न देता त्यांच्या लोंबकळत असणाऱ्या मुळांना अन्नद्रव्ययुक्त पाण्याच्या 50 ते 100 मायक्रोन या छोट्या-छोट्या सूक्ष्म आकाराच्या फवारणीद्वारे दिली जातात. या प्रकारामध्ये भाजीपाला वनस्पती वरच्या जाळीदार नेट कप मधून वरच्या वर असतात तर त्यांची मुळे एका बंदिस्त बॉक्समध्ये तरंगतात व त्यावर ठरावीक ठरविलेल्या वेळाने पोषक अन्नद्रव्ययुक्त पाण्याचे रूपांतर धूक्या रूपात होऊन त्यांचा पुरवठा केला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाढ माध्यमाचा समावेश होत नाही तर पाण्याचा धूक्या स्वरूपातील फवारा हेच माध्यम म्हणून काम करते.या प्रकारचे तंत्रज्ञान अतिशय प्रगत व उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये मात्र ठराविक प्रकारचाच भाजीपाला घेता येऊ शकतो. उदाहरणार्थ: लेट्युस, सॅलरी, पालक, बेसिल व याबरोबरच काही औषधी वनस्पती देखील घेता येऊ शकतात.
या तंत्रात मोठ्या खोलीमध्ये किंवा बॉक्स सारख्या चौकोनी अथवा आयताकृती आवरणामध्ये वरच्या बाजूस आपल्याला हव्या त्या आधाराच्या कप किंवा नेट कप याचा वापर करून इतर ठिकाणी वाढविलेले भाजीपाला पिकांची रोपे त्यामध्ये अशा पद्धतीने ठेवण्यात येतात जेणेकरून त्यांची मुळे खालच्या बाजूस लोंबकळत अथवा निलंबित ठेवतात. त्यानंतर या मुळावर पोषक अन्नद्रव्ये युक्त पाण्याचे धूक्या स्वरूपात फवारणी केली जाते. या तंत्रामध्ये ठराविक वेळेनंतर अन्नद्रव्ययुक्त पाणी-धुक्याची फवारणी केली जात असल्यामुळे वाढ चांगली दिसून येते. या तंत्रामध्ये पिकांची मुळे सुकणार नाहीत याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक ठरते. या तंत्रामध्ये मृदा किंवा माती याचा संबंध येत नसल्याने मातीतून येणाऱ्या रोग चा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने आरोग्यदायी भाजीपाला उत्पादित करता येतो तसेच कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.
एरोपोनिक तंत्राचे फायदे :
१. यामध्ये पालेभाज्या महागडी औषधी वनस्पती टोमॅटो स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात.
२. या तंत्रात जास्तीत जास्त अन्नद्रव्य कार्यक्षमता मिळविता येते.
३. सिंचन पाण्याची 80 ते 90 टक्क्यांपर्यंत बचत होऊन फक्त दहा ते वीस टक्केच वापर होतो. ( उदाहरणार्थ मृदा व माती व सिंचन पाणी 100 लिटर लागत असेल तर यामध्ये फक्त दहा ते वीस लिटर पाण्याचा वापर होऊन तेवढेच उत्पादन मिळते).
४. वनस्पती मुळाना मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा/ ऑक्सिजनचा व पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मिळत असल्याने भाजीपाला अथवा इतर पिकांची वाढ जलद व लवकर होते.
५. प्रयोगाअंती असेही दिसून आले की, भाजीपाला पिकांच्या वाढीचा कालावधी कमी होऊन जास्त प्रमाणात उत्पादन व उत्पादकता मिळते. तसेच या पद्धतीने वर्षातून जास्त वेळा पिके घेता येऊ शकतात.
६. या पद्धतीने तयार होणारा भाजीपाला मुळासहीत देखील खाता येऊ शकतो.
७. यामध्ये रोग किडीचे प्रमाण अत्यंत कमी होत असल्याने कीटकनाशकांचा किंवा रोग नाशकांचा वापर नसल्याचे दिसून येते.
८. यार भाजीपाला उत्पादन तंत्रामध्ये प्राणवायूचा/ ऑक्सिजन चा मुळाना मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याने रोगजंतू या ठिकाणी येण्याचे प्रमाण नगण्य दिसून येतील तसेच पिकांच्या मुळांद्वारे अन्नद्रव्य सुद्धा आवश्यक प्रमाणात घेतली जातात.
९. पोषक अन्नद्रव्य द्रावणाच्या यांच्या आकारावर मुळाची वाढ अवलंबून असते. कारण पाण्याच्या मोठ्या मोठ्या थेंबांच्या तुलनेत लहानात लहान सूक्ष्म पाणी ठेंबान द्वारे तुलनेने ऑक्सिजनचे प्रमाण जास्त उपलब्ध होते.
भारतामध्ये तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मॅडम या ठिकाणी फेमस ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एरोपोनिक फार्म असून तेथे विविध प्रकारच्या 80 भाजीपाला पिकांचे यशस्वी उत्पादन केले जाते. या या प्रकल्पाला तामिळनाडू कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे.
एरोपोनिक तंत्राच्या मर्यादा :
१. या तंत्रामध्ये सुरुवातीची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे.
२. यामध्ये पाण्यामध्ये विद्राव्य असणारे रासायनिक खते व त्यातून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण ठरविण्यासाठी मृदा शास्त्रज्ञ यांची आवश्यकता भासते.
३. ठराविक प्रकारच्या भाज्या घेता येतात.
४. यामध्ये कुशल कामगारांची गरज भासते.
५. या पद्धतीत पोषक अन्नद्रव्य द्रावणाची क्षारता व सामू यावर वारंवार लक्ष देणे आवश्यक ठरते. कारण सामू किंवा क्षारता यांच्यावरच मुख्यत्वेकरून अन्नद्रव्यांची उपलब्धता या तंत्रामध्ये अवलंबून असते.
६. सातत्यपूर्ण विजेचा पुरवठा असणे आवश्यक ठरते.
Read More : हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान माहिती
Read More : Plant Nutrient Deficiencies
Post a Comment