तरंगत्या तरफयावरील हायड्रोपोनिक तंत्र [Deep Water Culture]
वनस्पतीची अथवा भाजीपाला पिकांची मुळे चौकोनी अथवा आयताकृती वाफ्यातील पोषक अन्नद्रव्ये युक्त पाण्यात बुडविलेल्या असतात त्यातून वनस्पतीमुळे आवश्यक त्या प्रमाणात अन्नद्रव्य घेतात व त्यांची वाढ होते. या पद्धतीमध्ये चौकोनी तरफयातील अन्नद्रव्ययुक्त पाण्यामध्ये सातत्याने प्राणवायूचा पुरवठा करण्यात येतो या वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे एक फुटापर्यंत पाण्याची खोली ठेवले जाते व त्यातच घेण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकांसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या विद्राव्य अन्नद्रव्यांची मात्रा टाकली जाते. या पाण्यावर तरंगेल असा तरफेचा किंवा थर्माकोल अथवा इतर उपलब्ध शीट वापरतात. या शीटवर घेण्यात येणाऱ्या पालेभाज्या पिकांच्या आवश्यकतेनुसार ठराविक अंतरावर नेट कपच्या आकाराचे भोके घेऊन त्यावर रोपे अशा प्रकारे ठेवली जातात ठेवली जातात जेणेकरून त्यांची मुळे अन्नद्रव्ययुक्त पाण्यात बुडतील. याच पद्धतीला इंग्रजीमध्ये डी डब्ल्यू सी म्हणजेच Deep Water Culture देखील म्हणतात. कमी कालावधीत तयार होणारे पान वर्णीय भाज्या किंवा औषधी वनस्पती चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात. पालक लेट्युस कोथिंबीर बेसिन मेथी इत्यादी पिके फार चांगल्या पद्धतीने घेण्यात येतात.
यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्यामध्ये सातत्यपूर्ण पुरेसा प्राणवायू असणे आवश्यक आहे. यामधील पोषक अन्नद्रव्ये युक्त पाण्याचा सामू साधारणतः 5.5 ते 6.00 च्या दरम्यान असणे आवश्यक ठरते. तसेच यामध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाणदेखील 550 ते 800 मिलीग्राम प्रति लिटर असणे गरजेचे ठरते. या पाण्याची क्षारता 0.8 ते 1.2 डेसी सायमन प्रति मीटर असणे गरजेचे ठरते.
या तंत्रामध्ये पोषक अन्नद्रव्ये युक्त पाण्यामधील प्राणवायूचे ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड चा वापर देखील तज्ञांच्या सल्ल्याने करता येऊ शकतो. बी डब्ल्यू सी मधील पान वर्गीय भाजीपाला पिकांसाठी लागणार्या आवश्यक बाबी खालील तक्त्यात नमूद केल्याआहेत.
⯀ तरंगत्या तरफयावरील हायड्रोपोनिक तंत्र फायदे :
1. यामध्ये हरितगृह,पाण्यामध्ये विद्राव्य असणारी पोषक अन्नद्रव्ये, प्राणवायू साठीचा पंप, मोटार, भाजीपाल्याचे बियाणे, तरफा किंवा शीट, नेटकप इत्यादी बाबी लागतात. 2. कमी कालावधीत आरोग्यदायी पालेभाज्या घेण्यासाठी उपयुक्त पद्धत. 3. ही पद्धत समजण्यास व देखभाल करण्यास अत्यंत सोपी आहे. 4. पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता प्राणवायूचा पुरेसा पुरवठा असल्याने पिकांची वाढ चांगल्या व जलद गतीने होते.
⯀ तरंगत्या तरफयावरील हायड्रोपोनिक तंत्र मर्यादा :
1. पाण्यातील पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण पिकाच्या वाढीनुसार कमी अधिक होत असल्याने त्याची देखभाल करणे आवश्यक ठरते.
2. वनस्पती पोषक अन्नद्रव्ययुक्त पाण्याचा सामू व क्षारता यांची वारंवार मोजणी मोजणी आवश्यक ठरते.
3. या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वनस्पतीची वाढ चालू असल्याने कमी होते त्यामुळे त्यामध्ये हवेच्या मोटारीने पुरवठा करणे आवश्यक ठरते.
4. चौकोनी अथवा आयताकृती वाक्यातील पोषक अन्नद्रव्ययुक्त पाण्याचा संपर्क प्रत्यक्ष प्रकाशाशी आल्यास त्यामध्ये शेवाळ वाढल्या जाऊ शकतो.
Post a Comment