या तंत्रामध्ये पोषक अन्नद्रव्ययुक्त पाण्याचे चौकोनी आकाराच्या किंवा गोलाकार पाईप मधून सातत्याने वहन होते व त्याद्वारे पिकांची मुळे लागणारे अन्नद्रव्ये शोषून घेतात या तंत्रात वापरात येणाऱ्या एन. एफ. टी. चॅनल [NFT channel] अथवा पाईप ची लांबी साधारणपणे तीन मीटर असते. प्रत्येक एन.एफ.टी. पाईप मध्ये पोषक अन्नद्रव्ये युक्त पाणी एका बाजूने सोडण्यात येते तर दुसऱ्या बाजूने परत गोळा करून पुन्हा हे पाणी याच पाईपद्वारे फिरविले [Recirculation] जाते. सदरचे पाईप 100X80 एम. एम. किंवा 100X80 एम. एम. या आकारांचे मोठ्या प्रमाणात किंवा व्यवसाय प्रमाणात वापरण्यात येतात. आपल्या उपलब्ध जागेनुसार या पाईप ची लांबी ठरवता येते किंवा सध्या बाजारात तीन मीटर लांबीचे NFT channel सहज रित्या मिळू शकतात. या तीन इंची व्यासाचे व सहा इंच अंतरावर साधारणपणे झाडे लावण्यासाठी 18 छिद्र मिळतात. दोन छिद्रमधील अंतर पिकांच्या प्रकारानुसार व त्याच्या वाढीच्या प्रकारानुसार कमी अधिक करता येऊ शकते. पाईप चा आकार चौकोनी असल्याने त्यातील पोषक अन्नद्रव्ये युक्त पाण्याचे वहन संथ गतीने होते जेणेकरून त्यातून पिकांच्या मुळाद्वारे अन्नद्रव्ये शोषली जाऊ शकतात.याबरोबरच अलीकडील काळात काही शहरानजीकच्या तरुण शेतकऱ्यांनी पी. वी. सी. चे गोलाकार पाईपद्वारे भाजीपाला घेतला जाऊ शकतो.
जगामध्ये व भारतात देखील सध्या हे तंत्रज्ञान व्यवसायिक पातळीवर पान वर्गीय भाजीपाल्याचे उत्पादन एन एफ टी चा वापर करून घेण्यात येतो. या तंत्रात घेण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकांची प्रथमतः रोपे तयार करून त्या रोपांना दोन किंवा तीन पाने आल्यानंतर किंवा पुरेशा प्रमाणात मुळे फुटल्यानंतर पाईप ला असणाऱ्या छिद्रत्रावर नेटकप किंवा इतर माध्यमांचा आधार घेऊन ठेवले जातात. यामध्ये पान वर्गीय भाजीपाल्याची मुळे अन्य द्रव्य युक्त पाण्यामध्ये बुडल्या जातील अशा पद्धतीने ठेवले जातात.
एन एफ टी हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे भाजीपाला उत्पादनासाठी हरितगृह, एन एफ टी चॅनेल्स किंवा एन एफ टी पाईप्स, पाण्याची मोटर, नेट कप्स, वाढ माध्यमे, पाण्यात विद्राव्य असणारे पोषक अन्नद्रव्ये, प्राणवायू पुरवठा करण्यासाठी चा पंप, पाण्याच्या टाक्या, भाजीपाला पिकांची बियाणे इत्यादी बाबी आवश्यक ठरतात.
⯀ एनएफटी [NFT] - हायड्रोपोनिक तंत्राचे फायदे:
Post a Comment