हायड्रोपोनिक्स तंत्र मधील पोषक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. भाग २

हायड्रोपोनिक्स तंत्र मधील पोषक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. भाग  २

 

3. पीक पोषक अन्नद्रव्याचा  द्रावणाचा सामू [pH]:


हायड्रोपोनिक तंत्रातील भाजीपाला उत्पादन नियंत्रित करणारा घटक म्हणजे सामू होय. हायड्रोपोनिक तंत्रामध्ये किंवा माती द्वारे घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्याने सामू वर अवलंबून असतो. पोषक अन्नद्रव्ये युक्त द्रावणाचा सामू व क्षारता योग्य ठेवणे अतिशय महत्वाचे ठरते त्यामुळेच हे दोन्ही घटक दररोज मोजणे आवश्यक आहे. पोषक अन्नद्रव्ये द्रावणामध्ये धन प्रभारित व ऋण प्रभारित अन्नद्रव्ये असतात. या धन व ऋण प्रभारित अन्नद्रव्यांचे एकमेकांसोबत एक संतुलितपण आढळून येतो. पोषक अन्नद्रव्ये द्रावणामध्ये यापैकी एकाचे देखील प्रमाण वाढल्यास त्याचा विपरीत परिणाम दुसऱ्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर होतो. उदाहरणार्थ नायट्रेटचे शोषण धन प्रभारित अन्नद्रव्य पेक्षा जास्त झाल्यास द्रावणाचा सामू मध्ये वाढ दिसून येते त्यामुळे इतर अन्नद्रव्याच्या उपलब्धतेत अडचण निर्माण होतात. या प्रक्रियेस शरीरशास्त्रीय विम्लता असे म्हणतात [Marschner, 1995]. त्यामुळे द्रावण तयार करताना त्यात अमोनियम युक्त खते वापरल्यास फायद्याचे ठरते. पोषक अन्नद्रव्य द्रावणाचा सामू विमल झाल्यास विद्राव्य कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते व त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम कार्बोनेट हे अविद्राव्य घटक तयार होतात व ते पिकांना उपलब्ध होत नाही. स्फुरदाच्या बाबतीत देखील सामू विमल असल्यास त्याचे रूपांतर कॅल्शियम फॉस्फेट या अविद्राव्य स्वरूपात होऊन उपलब्धता कमी होते. सामू अमला [acidic] झाल्यास त्यातील असणाऱ्या लोहामुळे देखील स्फुरदाची उपलब्धता कमी होते.


हायड्रोपोनिक्स तंत्र मधील पोषक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. भाग  २


    अन्नद्रव्ययुक्त द्रावणाचा सामूचा अन्नद्रव्य उपलब्धतेवर परिणाम

सामू

अन्नद्रव्यांची उपलब्धता 

4.5  किंवा त्यापेक्षा कमी

स्फुरदकॅल्शियम,  मॅग्नेशियम  यांची उपलब्धता कमी होते उपलब्धता कमी होते

5  ते 5.5

स्फुरदाची उपलब्धता चांगली होते ते

पेक्षा खाली  व 7.5  पेक्षा जास्त

स्फुरदाची उपलब्धता कमी होत

6.5 पेक्षा जास्त

लोह,  तांबेमंगल,  जस्त    बोरॉन यांची उपलब्धता कमी होते

7.0  पेक्षा जास्त

लोह,  मंगल,   स्फुरदकॅल्शियम व मॅग्नेशियम यांच्या उपलब्धतेत अडचणी येतात

5.5 to 6.5  दरम्यान

हायड्रोपोनिक पोषक अन्नद्रव्ये युक्त द्रावणाचा आदर्श सामू


हायड्रोपोनिक भाजीपाला पिकासाठी योग्य सामू :

हायड्रोपोनिक तंत्रातील कोणत्याही प्रकाराचा अवलंब केल्यास त्यामध्ये विविध पिकानुसार सर्वसाधारणपणे अन्नद्रव्य द्रावणाचा सामू ठिकाणी परत्वे नियंत्रित करणे आवश्यक ठरते.


पान वर्गीय भाजीपाला

सामू

फळ वर्गिय भाजीपाला

सामू

लेट्युस [Lettuce]

5.5  ते  6.5

टोमॅटो

5.5 ते 7.0

पालक  

5.5  ते  6.6 

काकडी

5.8 to 6.0

सॅलरी [Celery]

6.5

ढोबळी मिरची 

5.5 ते 7.0

बेजील [Basil]  किंवा तुळस 

5.5  ते  6.5

लाल कोबी

6.5 ते 7.0

पुदिना

5.5  ते  6.5

झुकिनी

6.0

ब्रोकोली

ते 6.5

 

4. पिक पोषक अन्नद्रव्याच्या द्रावणाची क्षारता [EC/TDS]:


बहुतांश हायड्रोपोनिक तंत्रामध्ये पोषक अन्नद्रव्ये द्रावणाची क्षारता साधारणपणे 2.0 ते 3.0 डेसी सायमन प्रति मीटर किंवा त्यापेक्षा कमी असते.परंतु सुरुवातीची क्षारता पीकवाढीच्या कालांतराने जास्त होते. याबरोबरच हरितगृहातील तापमान व वनस्पतीच्या पानांद्वारे होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन वाढल्यास  क्षारता वाढते. त्यामुळे या तंत्रामध्ये वरचेवर क्षारता मोजणे व नियंत्रणात ठेवणे पीक वाढीसाठी आवश्यक ठरते. तसेच वनस्पती द्वारे ठराविक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा इतर अन्नद्रव्ये वर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच अन्नद्रव्ययुक्त द्रावणाची क्षारता किंवा त्यातील विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास मुळांद्वारे पाणी शोषून  घेण्यात अडचणी निर्माण होतात.खालील  तक्त्यात क्षारता गटानुसार पिकांचे वर्गीकरण नमूद करण्यात आली आहे. 


क्षारता  गट

क्षारता

[डेसी सायमन प्रति मीटर]

पिके

संवेदनशील

1.4

लेट्युसस्ट्रॉबेरी कांदा गाजर

मध्यम संवेदनशील

3.0

ब्रोकोली कोबी काकडी टोमॅटो ढोबळी मिरची

मध्यम प्रतिकारक

6.0

पालक शतावरी 

 
 याबरोबरच पान वर्गीय व फळ वर्गीय भाजीपाल्यासाठी व पोषक अन्नद्रव्ये युक्त द्रावणाची क्षारता व त्यातील विद्राव्य क्षारांचे विविध पिकांसाठी उपयुक्त प्रमाण नमूद केले आहे

पान वर्गीय भाजीपाला

क्षारता

[डेसी सायमन प्रति मीटर]

विद्राव्य क्षार

मिलीग्राम प्रति लिटर]

लेट्युस [Lettuce]

0.8 ते 1.2

550 to 800

पालक [Spinach]  

1.8 ते 2.3

1260 ते 1610

सॅलरी [Celery]

1.8 ते 2.4

1210 ते 1680

बेजील [Basil]  किंवा तुळस 

1.0 ते 1.6 

700 ते 1120

पुदिना [Mint]

2.0 ते 2.4

1400 ते 1680

 

फळ वर्गीय भाजीपाला

क्षारता

[डेसी सायमन प्रति मीटर]

विद्राव्य क्षार

मिलीग्राम प्रति लिटर]

ढोबळी मिरची

1.8 ते 2.8 

1400 to 2000

टोमॅटो

2.0 ते 4.0

1400 ते 2800

ब्रोकोली

2.8 ते 3.5

1960 ते 2450

कोबी

2.5 ते 3.0 

1750 ते 2100

झुकिनी

1.8 ते 2.4

1680 ते 1860 


5. पीक पोषक अन्नद्रव्याचे तापमान:


   पोषक अन्नद्रव्ये युक्त द्रावणाचे तापमान हे हरितगृहातील तापमानापेक्षा कमी असता कामा नये.हरितगृहातील तापमान वाढल्यास वनस्पतीची पाण्याची गरज जास्त होते व अशा वेळी जर द्रावणाचे तापमान कमी असल्यास त्याचा वनस्पतीवर विपरीत परिणाम दिसून येतो. विपरीत परिणामांमध्ये पिके पिवळी पडणे व त्यावर एक प्रकारचा  तान आल्यासारखे वाटणे. हायड्रोपोनिक तंत्र मधील वनस्पतीची मुळे थंड किंवा कमी तापमान असणाऱ्या अन्नद्रव्ययुक्त पाण्यात राहिल्यामुळे वनस्पतीची एकंदर वाढ,  फुलधारणेसाठी  उशीरफुलधारणाफळधारणा व त्यांच्या प्रतीवर देखील परिणाम होतो.याबरोबरच पोषक अन्नद्रव्ये युक्त द्रावणाचे तापमान नियंत्रित असणे आवश्यक ठरते कारण वनस्पतींच्या मुळाना  सातत्याने प्राणवायूचा पुरवठा होणे गरजेचे ठरते.पोषक अन्नद्रव्य द्रावणाचे तापमान वाढल्यास त्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते व त्यामुळे पिकाची वाढ मंदावते किंवा मुळाचा रंग करडा किंवा काळा होताना दिसते. खालील तक्त्यामध्ये तापमानानुसार प्राणवायूची विद्राव्यता दर्शविण्यात आलेली आहे. 


अनुक्रमांक

प्राणवायूची मात्रा [पीपीएम]

तापमान

1

5

12.80 सें

2

10

11.290 सें

3

15

10.080 सें

4

20

09.090 सें

5

25

08.260 सें

6

30

07.560 सें

7

35

06.950 सें

संदर्भ:  निकोल्स 2002 [Nichols, 2002]

 

Post a Comment

Previous Post Next Post